डेंग्यूने घेतला युवकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:50+5:302021-09-02T04:35:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहरात डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले असून, सिंधी कॉलनीतील रहिवासी साहिल सुनीलकुमार ...

डेंग्यूने घेतला युवकाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहरात डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले असून, सिंधी कॉलनीतील रहिवासी साहिल सुनीलकुमार बठेजा (वय २१) या युवकाचा डेंग्यू आजारामुळे जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणाच्या बदलामुळे, तसेच डासांच्या उत्पत्तीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना डेंग्यूची लागण होत आहे. २१ वर्षीय साहिल याला चार दिवसांपूर्वी भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर तब्येत खालावल्यानंतर पुढील उपचारार्थ जळगाव येथील खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अत्यंत मिलनसार, मनमिळाऊ स्वभावाचा एकुलता एक साहिलच्या मृत्यूने सिंधी कॉलनीत शोककळा पसरली आहे? ३१ रोजी संध्याकाळी पाच वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो माजी स्व. नगरसेवक भगवानदास बठेजा यांचा नातू आहे.
दरम्यान, एक आठवड्यापूर्वी सिंधी कॉलनीत औषध फवारणी करण्यात आली होती, तसेच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन समाजसेवक निकी बत्रा व अजय नागराणी यांनी केले आहे.