रावेर तालुक्यातील रसलपूरच्या २४ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:42 IST2019-07-24T21:41:17+5:302019-07-24T21:42:41+5:30
रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अशोक प्रकाश विंचूरकर या युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

रावेर तालुक्यातील रसलपूरच्या २४ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील रसलपूर येथील अशोक प्रकाश विंचूरकर (वय २४) या युवकाचा डेंग्यूमुळे मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान १९ रोजी मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, रसलपूर-खिरोदा प्र.रावेर रस्त्यालगतचे रहिवासी अशोक प्रकाश विंचूरकर (वय २४) यास डेंग्यूची लागण झाली. त्यास अत्यावस्थेत स्थितीत पुढील उपचारासाठी मुंबईच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूच्या संक्रमणामुळे फुफ्फूस, यकृत व मूत्रपिंड असे विविध अवयव निकामी होऊन त्याचा औषधोपचारादरम्यान १९ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला. या रूग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू प्रमाणपत्रात डेंग्यूच्या संक्रमणामुळे संबंधित अवयव निकामी होऊन मृत्यू झाल्याचे कारण अधोरेखित केले आहे. त्यामुळे रसलपूर गावात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेबाबत होणाऱ्या दुर्लक्षामुळे ही परिस्थती ओढविल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे ईश्वर शर्मा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.