लोकशाही दिन होणार ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:46+5:302020-12-04T04:45:46+5:30
जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन आता ऑनलाईन होणार आहे. शासनाने तालुका, ...

लोकशाही दिन होणार ऑनलाईन
जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन आता ऑनलाईन होणार आहे. शासनाने तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीय आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यासाठी नागरिकांनी संबधित तहसिल कार्यालायत सोमवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.