हरिभाऊ महाजनांच्या निधनाने उमद्या नेतृत्वाला मुकलो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:48+5:302021-02-05T05:58:48+5:30

प्रतिक्रिया जिल्ह्यात हरिभाऊ महाजन शिवसेनेचे पहिले आमदार झाल्यामुळे, त्यावेळी शिवसैनिकांच्या बाजूने एक मोठी ताकद निर्माण झाली होती. शिवसैनिक म्हणून ...

With the demise of Haribhau Mahajan, Umadya lost his leadership. | हरिभाऊ महाजनांच्या निधनाने उमद्या नेतृत्वाला मुकलो..

हरिभाऊ महाजनांच्या निधनाने उमद्या नेतृत्वाला मुकलो..

प्रतिक्रिया

जिल्ह्यात हरिभाऊ महाजन शिवसेनेचे पहिले आमदार झाल्यामुळे, त्यावेळी शिवसैनिकांच्या बाजूने एक मोठी ताकद निर्माण झाली होती. शिवसैनिक म्हणून काम करत असताना, त्यांचे काम जवळून पाहता आले. आमदार झाल्यानंतर त्यांनी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर पक्षबांधणीचे काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यात राजकारणात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

गजानन मालपुरे, माजी महानगरध्यक्ष, शिवसेना

---

ज्या वेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी हरिभाऊ महाजन यांना जिल्ह्यात प्रथम आमदारकीचे तिकीट दिले, त्यावेळी त्यांना निवडून येण्याकरिता कार्यकर्ता म्हणून धरणगाव व एरंडोलमध्ये प्रचार केला होता, ते मितभाषी व मनमिळाऊ होते. त्यांचे वडील कीर्तनकार असल्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून निवडून आणले. निवडून आल्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याचे काम केले. हरिभाऊंच्या जाण्याने एक चांगले उमदे नेतृत्व आमच्यातून निघून गेले आहे.

किशोर, भोसले, युवा सेना बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख

---

माजी आमदार हरिभाऊ महाजन हे एक धडाडीचे कार्यकर्ते होते. तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी धावून जायचे. मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष असताना महाजन यांचे काम जवळून पाहिल्याने, त्यांना आमदारकीचे तिकीट देण्यासाठी स्व. बाळासाहेबांकडे शिफारस केली होती. त्याच्या जाण्याने धडाडीचे नेतृत्वाने गमावले आहे.

सदाशिव ढेकळे, नगरसेवक तथा माजी महापौर, शिवसेना

Web Title: With the demise of Haribhau Mahajan, Umadya lost his leadership.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.