सावखेडा येथे लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:07+5:302021-07-15T04:13:07+5:30
सावखेडा, ता. रावेर : कोविड प्रतिबंधक लस १८ वर्षांवरील सर्वांना देणे सुरू करण्यात आले आहे. परंतु शासनाकडून लसींचा ...

सावखेडा येथे लसीकरणाची मागणी
सावखेडा, ता. रावेर : कोविड प्रतिबंधक लस १८ वर्षांवरील सर्वांना देणे सुरू करण्यात आले आहे. परंतु शासनाकडून लसींचा पुरवठा कमी होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदा येथे परिसरातून येणारे आबालवृद्ध तसेच युवक मंडळींचे खूप हाल होत आहेत. लसींचा तुटवडा आल्याने वृद्ध महिलांना व पुरुषांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
तरुण तर संभ्रमात आहेत की १८ ते ४५ वर्षांच्या तरुणांना लस केव्हा मिळणार? दररोज लस येण्याची वाट तरी किती बघावी? सुदैवाने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. परंतु शासनाने लसींचा पुरवठा वाढवावा, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून होत आहे. शासन लसीचा तुटपुंजा पुरवठा करीत आहे. खिरोदा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सावखेडा व अन्य गावांमध्ये कोरोना लसीकरण शिबिर घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जेणेकरून आबालवृद्धांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.