वरणगाव शहरातील समांतर महामार्गाचे काम सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST2021-07-20T04:12:49+5:302021-07-20T04:12:49+5:30
नवीन बायपासचे काम पूर्ण झाले असल्याने वरणगावातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. त्याचा व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर ...

वरणगाव शहरातील समांतर महामार्गाचे काम सुरू करण्याची मागणी
नवीन बायपासचे काम पूर्ण झाले असल्याने वरणगावातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. त्याचा व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर फार मोठा परिणाम झालेला आहे. वरणगावला २८ खेडे लागून असल्याने तेथील लोकांना सर्व दैनंदिन व्यवहारासाठी वरणगाव शहरात यावे लागते. त्याकरिता समांतर महामार्ग होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. प्रकल्प संचालक सिन्हा यांचेकडे वारंवार मागणी केली, मात्र त्यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अखेर दिल्लीला जाऊन याबाबत नितीन गडकरी यांचेकडे समांतर रस्त्यासह विविध कामांबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनाची प्रत खासदार रक्षा खडसेंसह आमदार गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांनाही सुध्दा देण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे वरणगावच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.