नाशिक बससेवा चाळीसगावमार्गे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:06+5:302021-06-21T04:13:06+5:30
‘अंत्योदय’ एक्स्प्रेसला जळगावला थांबा देण्याची मागणी जळगाव : मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसला भुसावळनंतर थेट चाळीसगावला थांबा ...

नाशिक बससेवा चाळीसगावमार्गे सुरू करण्याची मागणी
‘अंत्योदय’ एक्स्प्रेसला जळगावला थांबा देण्याची मागणी
जळगाव : मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसला भुसावळनंतर थेट चाळीसगावला थांबा देण्यात आला आहे. मात्र, जळगावला थांबा नसल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने अंत्योदय एक्स्प्रेसला जळगावला थांबा देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
सखल भागातील खड्डे बुजविण्याची मागणी
जळगाव : शहरातील नवीपेठ, गोलाणी मार्केट, चौबे मार्केट परिसर, शिवतीर्थ मैदान, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, आदी ठिकाणच्या सखल भागात पाऊस आल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असते. यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून, परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तरी मनपा प्रशासनाने सखल भागातील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सुप्रीम कॉलनीत शक्तिवर्धक औषधीचे वाटप
जळगाव : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यातर्फे रविवारी सुप्रीम कॉलनी येथे शक्तिवर्धक औषधी द्रव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मोहन तिवारी, बजरंग दलाचे महानगर संयोजक राजू नन्नवरे, विठ्ठल पाटील, दिलीप सोनवणे, चंद्रकांत भापसे, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गजानन माळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राहुल पाटील, अशोक शिंदे, सुशील इंगळे, गणेश शेटे, शिवा पानसंबळ, ऋषीकेश अढाव, अनिकेत डुकरे, अमोल शिंदे, वैभव संकुडे, कृष्णा पानसंबळ, उमेश अटारे, नीलेश राठोड, आदींनी परिश्रम घेतले.