जळगाव : कोरोनामुळे गेल्या मार्चपासून भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्स्प्रेस बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांनाही आरक्षण मिळत नसल्यामुळे, प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बसस्थानकासमोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने बसस्थानकासमोरील विविध खाद्यपदार्थ विक्रेेत्यांच्या हातगाड्या हटवून, हा परिसर अतिक्रमण मुक्त केला होता. मात्र, या ठिकाणी पुन्हा खाद्यपदार्थ विक्रेेत्यांच्या हातगाड्या लावल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे.
सिंगल यंत्रणा बंदमुळे वाहने सुसाट
जळगाव : शहरातील चौकाचौकांतील सिग्नल यंत्रणा दिवसातून अनेकवेळा बंद राहत आहे. तसेच यावेळी चौकांमध्ये वाहतूक पोलीसही राहत नसल्यामुळे वाहनधारक सुसाट वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, दिवसा व सायंकाळींही सिग्नल यंत्रणा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.