जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST2021-03-31T04:17:28+5:302021-03-31T04:17:28+5:30
विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी जळगाव : जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ...

जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे, तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय
जळगाव : पासपोर्ट कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तरी पासपोर्ट कार्यालय प्रशासनाने या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दगडगोटे वर आले आहेत. यामुळे वाहनधारकांना संथगतीने वाहने चालवावी लागत आहेत. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अस्वच्छता
जळगाव : जिल्हा परिषदेजवळील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अनियमित साफसफाई करण्यात येत असल्याने अस्वच्छता पसरली आहे. यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या उद्यानाची नियमित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.