बोदवडची पडकी जीवघेणी विहीर दुरुस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:28 IST2020-08-04T16:28:27+5:302020-08-04T16:28:35+5:30
एका गायीचा गेला आहे बळी, मुलांनाही धोका

बोदवडची पडकी जीवघेणी विहीर दुरुस्त करण्याची मागणी
बोदवड : शहरात प्रभाग क्रमांक सहामध्ये नाल्या काठी एक जुनी विहीर असून या विहिरीचे बांधकाम खचले आहे. यामुळे रस्त्याला लागून असलेली विहर रस्त्याच्या समतल झाली आहे. परिणामी विहरीत जनावरे पडण्याच्या घटना घडल्या असून लहानमुलांसाठीही ही विहीर जीवघेणी ठरु शकते.
चार दिवसांपूर्वी एक गाय या विहिरीत पडून मृत पावली असून नागरिकांच्या मदतीने गाय विहरीतून बाहेर काढण्यात आली मात्र उपयोग झाला नाही. या विहिरीत रात्री बेरात्री आणखी जनावरे पडून दगावण्याची शक्यता आहे. नगर पंचायतने सदर विहिरीची दुरुस्ती करून देण्याची मागणी होत आहे.
सदर विहिरीला पाणीही असून नागरिकांच्या वापराच्या पाण्यासाठीही उपयोग केला जातो. तरी सदर विहिरीचे खचलेले बांधकाम दुरुस्त करण्याची गरज आहे.