भरवस्तीमधील वीटभट्ट्या हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST2021-07-09T04:12:15+5:302021-07-09T04:12:15+5:30
वरणगाव : येथील गट नं ६१६ मधील साई पार्क व हीना पार्कमध्ये भरवस्तीत अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. या भट्ट्या ...

भरवस्तीमधील वीटभट्ट्या हटविण्याची मागणी
वरणगाव : येथील गट नं ६१६ मधील साई पार्क व हीना पार्कमध्ये भरवस्तीत अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. या भट्ट्या बंद करण्यात याव्या, यासाठी या भागातील नागरिकांनी येथील तलाठी कल्पना गोरले यांना नुकतेच निवेदन दिले. वरणगाव व परिसरात बांधकामे जोर धरू लागल्यामुळे वीटभट्ट्यांना ऊत आलेला आहे. एवढेच नाही तर या वीटभट्ट्या रहिवासी वस्तीला लागून आहेत. अशाचप्रकारे येथील हीना व साई पार्कमध्ये असलेल्या वीटभट्ट्यांमुळे तेथील रहिवाशांना भट्टीतून निघणाऱ्या दूषित वायूला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी तेथील आबालवृद्धांच्या श्वसन क्रियेवर परिणाम होऊन दमा व अस्थमासारख्या दुर्धर आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे तरी या वीटभट्ट्या लवकरात लवकर हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर जावेद शाह युसूफ शाह एजाज टेलर, जावेद तडवी, इरफान पिजारी, मंगेश चौधरी, आनंद इंगळे यांचेसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरोग्याधिकारी यांनाही पाठविली आहे.
वरणगावच्या तलाठी कल्पना गोरले यांना निवेदन देताना नागरिक. (छाया : बाळू चव्हाण)