पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:15+5:302021-06-19T04:12:15+5:30
पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी एमआयएमतर्फे राज्यभर निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जळगावातही निवेदन देऊन दर ...

पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी एमआयएमतर्फे राज्यभर निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जळगावातही निवेदन देऊन दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अधिभार, व्हॅट व इतर कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतील, असे निवेदनात म्हटले आहे.
महानगर जिल्हा समन्वयक ॲड. इम्रान हुसेन, ग्रामीण जिल्हा कॉर्डिनेटर शेख अहमद हुसेन, हाजी युसूफ शेख, अक्रम देशमुख, माजी जिल्हा झोनल अध्यक्ष रेयान जहागीरदार, उसमा शेख यांनी निवेदन दिले. खालीद खाटीक, इमरान खान, झुबेर देशमुख, सद्दाम खान, नूर न्हावी, शेख शकिर, वसीम शेख, अमन शेख, उमर शेख, सैय्यद शराफत अली, राशीद खान, शेख आसिफ, शोएब मिर्झा, आखलाक शेख, उमर शेख, नोमान खान आदी उपस्थित होते.