शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:17 IST2019-10-31T21:17:25+5:302019-10-31T21:17:36+5:30
चोसाका थकीत पेमेंट प्रकरण : संचालक मंडळाने बैठकीकडे फिरवली पाठ

शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी
चोपडा : शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत संचालक मंडळाने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. अन्यथा शेतकरी कृती समिती योग्य तो निर्णय जाहीर करेल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी दिला आहे.
तहसीलदार अनिल गावित यांनी ३० रोजी भ्रमणध्वनीवर चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ३१ रोजी बैठकीचा निरोप दिला होता. चोसाका चेअरमन व शेतकरी कृती समिती सदस्य यांच्यासोबत सकाळी ११ वाजता बैठक बोलावली होती. ही बैठक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची होती, परंतु मला वेळ ऐकू आली नाही असे सांगून चेअरमन अतुल ठाकरे बैठकीला आले नाहीत. त्यांच्यासह पदाधिकाºयांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी कळविले आहे.
चोसाका सुरु रहावा यासाठी शेतकरी कृती समिती व सर्व शेतकरी, कामगार यांनी गेल्या चार वर्षात वेळोवेळी आपल्या पैश्यांवर पाणी सोडले व माघार घेतली आहे. परंतु शेतकºयांचा चांगुलपणा हा संचालक मंडळाने कृती समितीची कमजोरी न समजता शेतकºयांना हसण्यावारी घेऊ नये. याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने समस्या सोडवाव्यात, अन्यथा आम्ही निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी कळविले.