रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:03+5:302021-09-15T04:20:03+5:30

गडखांब येथील रेशन दुकान क्रमांक १५० चा मालक योगेश साहेबराव महाले हा शासन नियमाप्रमाणे धान्य देत नाही, त्याची पावतीदेखील ...

Demand for permanent cancellation of ration shop | रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

गडखांब येथील रेशन दुकान क्रमांक १५० चा मालक योगेश साहेबराव महाले हा शासन नियमाप्रमाणे धान्य देत नाही, त्याची पावतीदेखील देत नाही, तसेच माल आल्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या आत नेण्यासाठी सक्ती करतो, एखाद्या घरातील व्यक्ती मयत झाल्यास त्याचे नाव कार्डावरून कमी न करता त्याचाही माल मागवतो. मात्र, त्या कुटुंबाला त्याचा माल देत नाही व जाब विचारायला गेलेल्या नागरिकांना धमकी देतो, अशी तक्रार दिलीप पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, किशोर पाटील, दिनेश पाटील, सर्जेराव पाटील, सुपडू पाटील, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, ताराचंद पाटील, वालजी पाटील, सरलाबाई पाटील, सिंदूबाई पाटील, मनीषा पाटील, शोभा पाटील, संगीता पाटील, कल्पना बोरसे, शकुंतला सोनवणे, काशीनाथ कोळी, दिनकर कोळी यांच्यासह सुमारे ३०० नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसेच जोपर्यंत दुकानाचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत दुसऱ्या दुकानदाराला ते जोडण्यात यावे, अशीही मागणी केली असून निवेदनाच्या प्रती सरपंच तथा दक्षता समितीचे सचिव, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

Web Title: Demand for permanent cancellation of ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.