तांदलवाडी-निंभोरा गटातील कामांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:15+5:302021-07-23T04:12:15+5:30
या निवेदनात नमूद केली आहे की, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी राजकीय ...

तांदलवाडी-निंभोरा गटातील कामांच्या चौकशीची मागणी
या निवेदनात नमूद केली आहे की, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी राजकीय सूडभावनेतून दलित वस्ती सुधार योजनेची चौकशी लावली असून, दलित समुदाय विकासकामांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनावर विधान सभा क्षेत्र प्रमुख युवराज भालेराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, विधानसभा क्षेत्र प्रभारी संतोष ढिवरे, माजी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ईश्वर जाधव यांचे स्वाक्षऱ्या असून, हे निवेदन निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार यांना देण्यात आले.
दरम्यान, नंदकिशोर महाजन यांचे जि. प. सदस्यत्व रद्द करून अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करा, अशी मोगणी रा. काँ. आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष चाँदखाँ तडवी यांनी केली आहे.