शेतमजुरांना मानधनवाढ त्वरित देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:28 IST2019-09-14T22:27:58+5:302019-09-14T22:28:05+5:30
चोपडा : युनियनतर्फे आंदोलनाचा इशारा

शेतमजुरांना मानधनवाढ त्वरित देण्याची मागणी
चोपडा : शेतमजुरांच्या मानधन वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ती त्वरित मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतमजूर यूनियनतर्फे देण्यात आला आहे.
शासनाकडून ६५ वर्षांवरील शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, तसेच संपूर्ण निराधार, दिव्यांग आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या विधवा महिलांना श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना या अंतर्गत दरमहा ६०० रूपये मानधन मिळत आहे.
यामध्ये वाढ करण्यासंबंधी गेल्या ७ ते ८ वर्षांत राज्य सरकारने अनेक वेळा घोषणा केल्या आहेत.
गेल्या महिन्यातही सरकारने मानधन वाढीबाबत केवळ घोषणा केली. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही.
शेतमजुरांच्या मानधनाच्या वाढीबाबत अंमलजावणी त्वरित करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लालबावटा शेतमजूर यूनियनतर्फे अमृत महाजन, जिल्हा सचिव, गोरख वानखेडे, नामदेव कोळी, अरमान तडवी, जिजाबाई राजपूत, ठगूबाई कूंभार, कैलास महाजन, नानाभाऊ पाटील, वासूदेव कोळी, संतोष कुंभार यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.