भरगच्च पगारासाठी शरीरसुखाची मागणी
By Admin | Updated: November 6, 2014 15:23 IST2014-11-06T15:23:02+5:302014-11-06T15:23:02+5:30
कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला भरगच्च पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर गजाआड.

भरगच्च पगारासाठी शरीरसुखाची मागणी
जळगाव : औद्योगिक वसाहतीतील रेनॉल्ट मोटर्सच्या शोरूममध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला २५ हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर (३0) रा.इंदिरानगर, नाशिक याला महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पकडून एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले.
या शोरूममध्ये सी.आर.एम. या पदासाठी मंगळवारपासून मुलाखती सुरू आहेत. आतिष याने मुलाखतीवेळी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने युवतीचा हात हातात घेऊन त्याचे चुंबन घेतले.
बुधवारी दुपारी १२.३0 वाजता या दोघींनाही त्याने रेनॉल्टच्या शोरूममध्ये बोलाविले होते. या प्रकाराबाबत युवतींनी महिला सुरक्षा समितीच्या पदाधिकार्यांना कळविले होते.
त्यांनी बुधवारी युवतीला त्याच्याकडे पाठवून युवतीच्या मोबाइलवरून त्याचे संभाषण ऐकले. हे संभाषण संशयास्पद वाटल्याने समितीच्या सदस्यांनी त्याला बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पकडून एम. आय. डी. सी. पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित युवतीची फिर्याद व महिलेच्या साक्षीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.