मेहरुण तलाव स्वच्छ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:10+5:302021-02-05T06:01:10+5:30

प्रजासत्ताक दिन साजरा जळगाव : महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद खिंवसरा यांच्या हस्ते ...

Demand to clean Mehrun Lake | मेहरुण तलाव स्वच्छ करण्याची मागणी

मेहरुण तलाव स्वच्छ करण्याची मागणी

प्रजासत्ताक दिन साजरा

जळगाव : महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद खिंवसरा यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले. मुख्याध्यापिका साधना शर्मा, उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. साहेबराव पाटील, नीलेश पाटी, समीधा सोवनी आदींनी परिश्रम घेतले.

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सन्मान

जळगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही कोरोना योद्धा म्हणून सत्कार करावा, शिवाय त्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाकडून जि. प. समोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्याचे प्रशासनाने मान्य केले असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव कॉ. अमृतराव महाजन यांनी दिली. धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष संतोष खरे, राजेंद्र खरे, मलखान राठोड, संदीप देवरे, सत्तार तडवी आदी उपस्थित होते.

लोकहितम संस्थेच्या अध्यक्षपदी जाधव

जळगाव : योगाचा प्रचारासाठी स्थापन लोकहितम योग व बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी विजय बाबूलाल जाधव यांची निवड कण्यात आली आहे. कार्यकारी मंडळात उपाध्यक्ष मंगला जाधव, खजिनदार प्रवीण चौहान, सचिव विजय जाधव, सहसचिव धनश्री जाधव, सभासद विठ्ठल जाधव, सदस्य आशा जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

पासपोर्ट फोटो आहे

Web Title: Demand to clean Mehrun Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.