वाळू वाहतूक थांबत नसल्याने सीसीटीव्हीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:37+5:302021-09-14T04:21:37+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नेमलेले पथकच गायब असल्याने वाळूमाफियांना धाकच नाही. अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात ...

वाळू वाहतूक थांबत नसल्याने सीसीटीव्हीची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नेमलेले पथकच गायब असल्याने वाळूमाफियांना धाकच नाही. अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. गावागावात नेमलेल्या ग्रामदक्षता समित्याही नुसत्या नावालाच असल्याने यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कढोली परिसरात वाळूसाठी मोठ्या प्रमाणात टेकड्या कोरून वाळू काढली जात असल्याने संपूर्ण गाव परिसर भकास झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अवैध वाळू वाहतूक थांबत नसल्याने वैजनाथ, टाकरखेडा येथे नदी परिसराजवळ मुख्य रस्त्यावर, तसेच कढोली गाव परिसराजवळ मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात गावपातळीवर ग्रामदक्षता समितीला याचे अधिकार आहेत; पण त्यांचेही दुर्लक्ष होत असेल तर तहसीलदारांच्या वतीने नियमात असेल, अशी माहिती घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.
-सुचिता चव्हाण, तहसीलदार, एरंडोल