जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.मांडवे बुद्रुक, मांडवे खुर्द, कुंभारी तांडा, भारुडखेडे, हरीनगर, वाकोद व तोंडापुर परिसरातील शेतात जावून पीक स्थितीची पाहणी केली. कमी पावसामुळे यंदा उत्पन्नात मोठी घट आली आहे. झालेला खर्चसुध्दा निघाला नाही, अशी व्यथा शेतकºयांनी मांडली.कुंभारी तांडा येथील जि.प.च्या शाळेत शिक्षक नाही, रस्ता नाही, घरकुल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी त्यांचेकडे केली. कुंभारी तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. पाणी टंचाई असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. मांडवे खुर्द येथील शेतकरी जुम्मा तडवी यांच्या शेतातील सुमारे ४० क्विंटल मका कोणीतरी जाळल्याने महाजन यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. भारुडखेडे येथील ग्रामस्थांनी गावाजवळ पाझर तलावाची मागणी केली.मंत्री महाजन यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, बीडीओ अजय जोशी, नररसेवक प्रा.शरद पाटील, जे.के.चव्हाण, सुरेश बोरसे, रमेश जाधव, दिपक तायडे उपस्थित होते
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:01 IST
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडल्या जलसंपदा मंत्र्यांपुढे दुष्काळाच्या व्यथाजामनेर तालुक्यात केली दुष्काळाची पाहणी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची केली तक्रार