पिलखोडला औट पोलीस स्टेशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:54+5:302021-09-04T04:19:54+5:30
पिलखोड, ता. चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील पिलखोड हे गाव मध्यवर्ती पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून गावाला लागून पंधरा ...

पिलखोडला औट पोलीस स्टेशनची मागणी
पिलखोड, ता. चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील पिलखोड हे गाव मध्यवर्ती पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून गावाला लागून पंधरा ते वीस खेडी आहेत; परंतु या गावी औट पोस्ट नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण, चोऱ्या, पशुधन चोरीचे प्रमाण वाढले आहे. मेहुनबारा पोलीस स्टेशन हे पिलखोडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना कळविण्यात येते; परंतु पोलीस एक ते दीड तासानंतर घटनास्थळी पोहोचतात. तोपर्यंत या चोरट्यांना संधी मिळून ते पसार होतात. पर्यायी आरोपी पकडण्यात अपयश येते म्हणून पिलखोड येथे औट पोस्टची मागणी गावातून व परिसरातून होत आहे. गिरणा जल फाउंडेशनमार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.