विमान अपघाताची दिल्लीच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:22+5:302021-07-18T04:13:22+5:30
चोपडा : चोपडा परिसरात प्रशिक्षण देणारे विमान कोसळून शुक्रवारी दुपारी अपघात झाला होता. या प्रकरणी दिल्ली येथील दोन सदस्यीय ...

विमान अपघाताची दिल्लीच्या
चोपडा : चोपडा परिसरात प्रशिक्षण देणारे विमान कोसळून शुक्रवारी दुपारी अपघात झाला होता. या प्रकरणी दिल्ली येथील दोन सदस्यीय टीमने
चौकशी केली आणि माहिती घेतली.
शिरपूर येथील स्कूल ऑफ एव्हिएशनचे दोन सीटर विमान शुक्रवारी कोसळून त्यात पायलट नुरुल अमीन (२८, रा. जेसी नगर, बंगळुरू) हा ठार तर अंशिका लखन गुजर (२४, रा. परिहार, खरगोन) ही प्रशिक्षणार्थी तरुणी जखमी झाली होती.
या अपघाताच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वेद चतुर्वेदी आणि अंशुम ऋषिप्रसाद हे दोन अधिकारी शनिवारी वर्डीनजीक पोहचले. हे अधिकारी
इंदूरहून येथे आले. शिरपूर येथे त्यांनी वैमानिक प्रशिक्षण स्कूलकडून माहिती घेतली. नंतर सातपुडा पर्वतात ज्या ठिकाणी विमान कोसळले होते त्या
ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केली. याबाबत त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आणि ही माहिती दिल्ली येथे कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी विमान गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून चोपडा या भागात येत नव्हते. परंतु अधिक माहिती जाणून घेतली असता विमान प्रशिक्षणासाठी
तीनशे किलोमीटर अंतराचा अकोला, शेगाव या परिसराचा मार्ग मंजूर केलेला होता.
विमान अचानक खाली आले आणि खाली आल्यानंतर ते वर जायला अडचण आली. ज्यावेळेस ते दिशा बदलू लागले. क्षणात ते परिसरातील एका झाडावर ते आदळले. त्याचवेळी दुसऱ्या एका झाडाला विमानाचे पाते लागले. त्यात पाते तुटल्याची माहिती मिळाली.
प्रशिक्षणार्थी महिला अंशिका गुजर यांना मुंबई येथे नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
अमिन याचे शव बंगळुरुकडे
या विमान अपघातात ठार झालेले पायलट नुरुल अमिन यांचा मृतदेह शनिवारी त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. तिथून कारने ते बंगळुरू येथे नेण्यात आला, अशी माहिती मिळाली.