ठळक मुद्देमदनीनगरच्या रहिवाशांची पालिकेकडे मागणीउपाययोजना करण्याची आवश्यकता
जामनेर, जि.जळगाव : शहरातील मदनीनगर भागातील एका कंपनीचे मोबाइल टॉवर रहिवाशांना त्रासदायक ठरत असल्याने हटविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मदनी नगरमधील गट नंबर १८०/२ मधील प्लॉट नंबर ११ मध्ये रिलायन्स टॉवर उभारण्यात आला आहे. त्यातून होणाºया हवाई प्रदूषणामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.टॉवरजवळ हाजी सय्यद करीम हॉल असून, परिसरात उर्दू शाळा असल्याने मोठी वर्दळ असते. प्रशासनाने तातडीने टॉवर हटवावे अन्यथा नागरिकांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर शेख इरफान, शेख जावेद , एल.एच.खान, मोहम्मद रफिक, अफसर शेख, सलीम शेख, मोहसीन शेख आदी रहिवाशांच्या सह्या आहेत.