बेवारस वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:42 IST2019-04-30T14:41:06+5:302019-04-30T14:42:00+5:30

धरणगाव : अकस्मात मृत्यूची नोंद

Dehydration death | बेवारस वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

बेवारस वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू


धरणगाव - येथील भांगकुवा लगत असलेल्या महादेव मंदिराच्या धर्मशाळेत गेल्या सहा महिन्यापासून राहणाऱ्या ६५ ते ७० वयाच्या वृध्दाचा सोमवार २९ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मयत वृध्द बेवारस असून त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
मयत अनोळखी वृध्द हा गेल्या सहा महिन्यापासून धर्मशाळेत राहत होता. परिसरातील नागरिकांच्या घरुन अन्न मागून तो आपली उपजिविका भागवित होता. सोमवार २९ रोजी मनोज कंखरे हे महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता. हा वृध्द मयत अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे खबर दिली. त्यानंतर मनोज कंखरे यांच्यासह काही जणांनी डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झालेले होते.
गेल्या काही दिवसापासून उन्हाची दाहकता वाढली आहे. ४५ ते ४७ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद होत आहे. शनिवार व रविवारी सर्वाधिक उन्हाचा तडाखा होता.रात्री उशिरापर्यंत तापमान चाळीशी खाली येत नसल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.
उन्हाचा तडाखा वृद्धाला असहय्य झाल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मयत वृध्दाची ओळख पटविण्याचे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे.

Web Title: Dehydration death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.