गावठी ते गावठीच ऱ्हास भो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:29+5:302021-09-14T04:20:29+5:30
हा प्रश्न प्रशासनासोबत आजूबाजूच्या जनतेसमोरही होता. नुकताच बंधारा बांधला आहे म्हणून दुरुस्तीला पैसे मिळणार नाही, दुरुस्तीसाठी मजुरी, अंदाजपत्रक, ...

गावठी ते गावठीच ऱ्हास भो
हा प्रश्न प्रशासनासोबत आजूबाजूच्या जनतेसमोरही होता. नुकताच बंधारा बांधला आहे म्हणून दुरुस्तीला पैसे मिळणार नाही, दुरुस्तीसाठी मजुरी, अंदाजपत्रक, निधीची तरतूद या बाबी वेळखाऊ आणि चालूच उपयोगी पडणाऱ्या नव्हत्या, पाणी तर आताच अडवले पाहिजे, यासाठी परिसरातील लोकांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांना समस्या मांडली आणि त्यांनी गावठी जुगाड तंत्रज्ञान अमलात आणायचे सांगून त्याचा खर्चही दिला. सुती गोणपाट, खारट चिकन माती यांचा लगदा, पेस्ट करून तिला खिडक्यांच्या गॅपमध्ये ठासून ठासून दाबल्याने बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबली ऐन वेळेवर गावठी तंत्रज्ञानाने गरज भागली आणि चक्क पाणी गळती थांबल्याने मग सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला... शेवटी शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगली. गावठी ते गावठीच ऱ्हास भो...
_ चुडामण बोरसे
राजकारणाचे स्टेअरिंग कुणाकडे
अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील ओझर परिसराचा दौरा नुकताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. दौरा करताना त्यांनी सांभाळलेले राजकीय संतुलन चर्चेचा विषय ठरला. भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना दोन्ही बाजूला बसवून गाडीचे स्टेअरिंग मात्र शिवसेनेचे डॉ. मनोहर पाटील यांचे हातात देऊन त्यांनी दाखविलेली समयसूचकता शिवसेना कार्यकर्त्यांना भावल्याचे दिसते. कारण भविष्यातील तालुक्याच्या राजकारणाचे स्टेअरिंग शिवसेनेच्या हाती असेल अशी पोस्ट भरत पवार यांनी टाकल्याने तिचीही चर्चा होत आहे. एकीकडे असे गुणगाण सुरू असताना दुसरीकडे दौऱ्यात सहभागी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते मात्र संभ्रमात होते. एखाद्या कार्यकर्त्याने विरोधक असलेल्या नेत्याची साधी भेट घेतली तरी डोक्याला आटी पाडली जाते व आता यांचा एकोपा चालतो, अशी चर्चा यावेळी भिन्न
पक्षात काम करणारे कार्यकर्ते करीत होते. आता यातून काय समजावे, असाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी घडीभरचे विरोधक आणि कायमचे मित्र असतात... अशीही पोस्ट आता फिरू लागली आहे.
- चुडामण बोरसे.