आफ्रिकेच्या विधीमंडळात रक्षा खडसे यांचे भाषण
By Admin | Updated: November 5, 2014 14:58 IST2014-11-05T14:58:50+5:302014-11-05T14:58:50+5:30
राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ''भारतीय लोकशाही आणि सुशासन'' या विषयावर आपले विचार मांडले.

आफ्रिकेच्या विधीमंडळात रक्षा खडसे यांचे भाषण
मंबाथो : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ''भारतीय लोकशाही आणि सुशासन'' या विषयावर आपले विचार मांडले. या अधिवेशनाची सुरुवात २ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या वायव्य प्रांताच्या ''मंबाथो'' येथील विधीमंडळ सभागृहात झाली. वायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका, विविध राष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधीमंडळातून आलेले युवा संसद सदस्य व विधीमंडळ सदस्य उपस्थित होते. खासदार खडसे यांनी भारतातील संसद व विधीमंडळ सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया याबाबत माहिती दिली. भारतासारख्या मोठय़ा व खंडप्राय देशामध्ये सुशासन राहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था, न्यायपालिका व प्रसिद्धी माध्यमांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याबाबत विचार मांडले.