शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

दीपज्योती नमोऽऽस्तुते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:53 IST

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो.

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो. गोपूजन, गो-संवर्धन, गोमूत्र, गोमय, पंचगव्य, गाईचे दूध, गोधन, गोग्रास व गोरक्षण या सर्वागिण विषयावर चिंतन करून पूज्य व उपयुक्त असणाऱ्या गोमातेचं पूजन करून गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.नभांगणात आकाश कंदील लावून, पणत्या उजळवून, इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने आसमंत कसं प्रकाशमान भासतं. त्यातला भावार्थ म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनात, विचारात व आचारातदेखील ज्ञानाचा, सद्बुध्दीचा, सदाचाराचा दीप उजळून अज्ञानाचा, अंधकार दूर सारावा. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे,दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो!दिवाळी अर्थात प्रकाशोत्सव! दीप म्हणजे श्रीलक्ष्मीचे प्रतिक. सायंकाळी दीवा लावण्याच्या वेळेत लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. याच कालावधीत सर्व मंदिरांमध्ये पहाटे काकड आरतीचा नित्यनेम असतो. नवीन कापडांचा केलेला मोठा काकडा नंतर नाजूकशा फुलवातीव्दारे केली जाणारी मंगल आरती, पहाट प्रसन्न व उत्साहीत करून जाते. त्यावेळी भगवंतांचे स्मरण असे केले जाते. ‘आनंदांची दीपावळी, घरी बोलवा वनमाळी, दारी घालीते रांगोळी, गोविंद गोविंद.’ त्याचप्रमाणे अध्यात्म सांगितले जाते.सुंदर माझ्या देहात, आत्मा हा नांदतो, चंद्र सूर्य दारात; गोविंद गोविंद.चंद्र, सूर्य संदर्भ म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे व सूर्य हा बुध्दीचा कारक आहे. श्रीमद् भागवत सुत्रानुसार,मन एवं मनुष्याणाम कारणम् बंधमोक्षयो।त्याचप्रमाणे दीप म्हणजे आरोग्याचेही प्रतिक. आयुर्वेद जनक धन्वंतरी देवता जयंती धनत्रयोदशीच! विश्व आरोग्य दिन पाळाला जातो.नरकासुरासारख्या अत्याचारी दृष्ट प्रवृत्तीच्या राजाचा, राक्षसाचा नाश करून भगवान श्रीकृष्णांनी बंदिवासातून मातांची मुक्तता केली, ती नरक चर्तुदशीलाच.श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती पूजनाचा आशय असा की, ज्ञानाने, शिक्षणाने परिपूर्ण होऊन संपत्ती प्राप्त करावी. परंतु त्यासाठी अपार कष्ट, त्याग याची तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिध्द सुत्र महत्वाचे आहे.‘स्वयं दीप बनो’संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी देखील अभंगात म्हटले आहे,नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.’विषमता, दरिद्रता, कलह, अराजकतेचा अंधार नाहीसा होवून, मनामनात समानतेची ज्योत लावण्याचा व प्रज्वलित करण्याचा हा दिवाळी सण सर्वांना सुख, समृध्दी व भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.- मुकुंद महाराज धर्माधिकारी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव