खेडगाव आरोग्य केंद्रात विविध साहित्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:03+5:302021-09-23T04:18:03+5:30
आमदार मंगेशदादा चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे, गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण ...

खेडगाव आरोग्य केंद्रात विविध साहित्याचे लोकार्पण
आमदार मंगेशदादा चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे, गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी खेडगाव, वाघळी, तरवाडे, पातोंडा, रांजणगाव या आरोग्य केंद्रांना वैद्यकीय साहित्य देण्यात आले आणि बहाळ व पोहरे येथे उपकेंद्रांना काॅन्सन्ट्रेटर साहित्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
यावेळी उपस्थित प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, डॉ. धीरज पाटील, डॉ. संदीप निकम दिनेश, बोरसे, श्रावण पाटील, संजय पाटील, साहेबराव पाटील, शेषराव पाटील व सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच सर्व डॉक्टर कर्मचारी, नर्स, आशा स्वयंसेविका यांचीदेखील उपस्थिती होती.
पंचक्रोशीतील पोहरे सरपंच काकासाहेब माळी, पंजाबराव नाना, उपसरपंच प्रमोद पाटील, दयाराम पाटील, श्याम सोनवणे, तुषार पाटील, शरद सोनवणे, उपखेड सरपंच महेश मगर, रावसाहेब पाटील, भीमराव सोनवणे, आबा रावते, गुलाब मास्तर, चिंचगव्हाण सरपंच राठोड, भोला भाऊ, सामाजिक वनीकरण विभागाचे अमित पाटील, कैलास साळुंखे, मरूपसिंग जाधव, सुनील राठोड, पंकज राठोड, नवल राठोड, योगेश राठोड, कांतीलाल राठोड, जलमित्र परिवार चाळीसगावचे सुचित्रा पाटील, सविता राजपूत, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले व आभार डॉ. चौधरी यांनी मानले.