शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

डी.एड. कॉलेज बंद होणार नाहीत, दर्जावाढीची संधी दिली जाणार!

By अमित महाबळ | Updated: April 20, 2023 20:48 IST

राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे; परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत.

अमित महाबळ 

जळगाव : नवीन शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून बंद होणार असल्याची चर्चा असली तरी यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाही. मात्र, बी.एड.साठी १२ वीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम शासकीय कॉलेजमध्ये सुरू होणार आहे.

राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे; परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत. ‘नवीन शैक्षणिक धोरणात डी.एड. कॉलेज २०२८ पर्यंत चालू राहतील आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर बी.एड.मध्ये करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ डी.एड. कॉलेज बंद होतील, असा चुकीचा घेतला गेला आहे’, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या उपसंचालक माधुरी सावरकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा डाएटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी दिली.केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे यांनी जळगाव जिल्ह्यात डी.एड.ची १२ महाविद्यालये आहेत. त्यासाठी इयत्ता १२ वीच्या निकालानंतर नोंदणी होते, अशी माहिती दिली. डी.एड. कॉलेज बंद करण्यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाहीत, असेही राणे यांनी सांगितले.

बी.एड. चार वर्षांचे

नवीन शैक्षणिक धोरणात बी.एड.च्या अनुषंगाने मोठे बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार बारावी उत्तीर्णांना बी.एस्सी. बी.एड., बी.ए., बी.एड. आणि बी.कॉम., बी.एड. हा चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. सुरुवातीला शासकीय कॉलेजमध्ये हे अभ्यासक्रम असतील. खासगी किंवा अनुदानित शिक्षण संस्थांना अजून परवानगी मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्यात शासकीय कॉलेज नाही. उमविच्या कार्यक्षेत्रात बी.एड.चे २८ कॉलेज असून, १६०० विद्यार्थीसंख्या आहे. दोन वर्षांचे बी.एड. २०३० पर्यंत सुरू राहणार आहे, असेही प्राचार्य अशोक राणे यांनी सांगितले.

बी.एड.साठी आजपासून सीईटी...

जळगाव जिल्ह्यातील रायसोनी कॉलेज, केसीई आयएमआर कॉलेज, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि पाळधी येथील केंद्रांवर बी.एड.साठी सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दि. २३ ते दि. २५ एप्रिलदरम्यान ही परीक्षा आहे. परीक्षेच्या निकालाची तारीखनंतर जाहीर केली जाणार आहे.

म्हणून डी.एड. मागे पडले...

गेल्या काही वर्षांत डी.एड.ला विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. आठ ते नऊ वर्षांत नवीन शिक्षकांची भरती झालेली नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लांबत गेले. टीईटी परीक्षा, अभियोग्यता चाचणी यामुळे डी.एड.कडे असलेला कल कमी होत गेला. जळगाव जिल्ह्यात पूर्वी डी.एड.ची ३४ महाविद्यालये होती. नंतर काही बंद झाली, तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या कमी झाली.

टॅग्स :JalgaonजळगावTeacherशिक्षकEducationशिक्षण