मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:39+5:302021-08-21T04:20:39+5:30
मुक्ताईनगर : गेल्या एक महिनाभरापासून पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जळून गेली आहेत. यामुळे मुक्ताईनगर तालुका ...

मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!
मुक्ताईनगर : गेल्या एक महिनाभरापासून पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जळून गेली आहेत. यामुळे मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कोरडवाहू शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून पेरणीसाठी लागलेली मशागत, फवारा व खाते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने तत्काळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, कुऱ्हा शिवसेना शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, रशीद तडवी (जोधनखेडा), संदीप डिवरे (सुळे), भाऊ तलवारे, भरत पाटील (रिगाव), किशोर खोले, अनिल पाटील (काकोडा), इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देताना नवनीत पाटील, विनोद पाटील, पंकज पांडव आदी. (छाया: विनायक वाडेकर )