चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:56+5:302021-08-18T04:22:56+5:30
निवेदनात म्हटले आहे की, चोपडा तालुक्यात यावर्षी पावसाळा जेमतेम असून शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या दोनदा मोडकळीस आलेल्या आहेत. सर्व खर्च ...

चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा
निवेदनात म्हटले आहे की, चोपडा तालुक्यात यावर्षी पावसाळा जेमतेम असून शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या दोनदा मोडकळीस आलेल्या आहेत. सर्व खर्च वाया गेला आहे .उर्वरित पिके करपा धरत असून त्यांची वाढ खुंटलेली आहे. एक महिन्यापसून पावसाचा थांगपत्ता नाही तरी महाराष्ट्र सरकारने त्वरित कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा. शेतकऱ्यांना दर एकरी १० हजार मदत द्यावी, चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात करावा. मजुरांना एमआरजीएस खाली रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच केळीचा भाव बोर्डाच्या भावाप्रमाणे देण्यात यावा, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमृत महाजन, शांताराम पाटील, गणेश धनगर, संतोष कुंभार, विश्वास शंकर धनगर, निंबाजी बोरसे, एम. जी. धनगर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. या मागण्यांवर कार्यवाही न केल्यास भाकप किसान सभातर्फे शेतकऱ्यांचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे.