वनदाव्यांवर लवकरच निर्णय
By Admin | Updated: October 25, 2015 00:21 IST2015-10-25T00:21:03+5:302015-10-25T00:21:03+5:30
प्रलंबित आठ हजार वनहक्क दाव्यांवर जिल्हा व विभागीय पातळीवर चौकशी करून लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय सचिव अशोक पै यांनी दिले

वनदाव्यांवर लवकरच निर्णय
तळोदा : तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रलंबित आठ हजार वनहक्क दाव्यांवर तातडीने कार्यवाहीसाठी वनअतिक्रमितांनी शनिवारी आदिवासी विकास विभागाचे केंद्रीय सचिव अशोक पै यांना साकडे घातले. या दाव्यांवर जिल्हा व विभागीय पातळीवर चौकशी करून लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अशोक पै यांनी शनिवारी सकाळी तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात वनहक्क दाव्यांबाबत आढावा घेतला. या तिन्ही तालुक्यातील वनजमीन अतिक्रमणधारकांचे जवळपास आठ हजार दावे जिल्हा व विभागीय पातळीवर अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याच्या तक्रारी अतिक्रमणधारकांनी मांडल्या. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सोनाली पोंक्षे, उपायुक्त अशोक लोखंडे, उपवनसंरक्षक डी.एम. पिंगळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे, डॉ.कांतीलाल टाटिया, माजी उपसभापती यशवंत ठाकरे आदी उपस्थित होते.