स्वतंत्र खटल्याचा निर्णय २ ऑगस्टला

By Admin | Updated: July 29, 2014 13:45 IST2014-07-29T13:45:37+5:302014-07-29T13:45:37+5:30

प्रा.व्ही.जी.पाटील खूनप्रकरणात सोमवारी न्या.डी.जे.शेगोकार यांच्या कोर्टात कामकाज झाले.

Decision on a separate case on August 2 | स्वतंत्र खटल्याचा निर्णय २ ऑगस्टला

स्वतंत्र खटल्याचा निर्णय २ ऑगस्टला

जळगाव : प्रा.व्ही.जी.पाटील खूनप्रकरणात सोमवारी न्या.डी.जे.शेगोकार यांच्या कोर्टात कामकाज झाले. आरोपी राजू सोनवणे याच्याविरुद्ध खटला स्वतंत्रपणे चालविण्याबाबत आरोपीतर्फे अँड.एस.के.कौल व सीबीआयतर्फे अँड.डी.एन.साळवी यांचा युक्तीवाद झाला.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती जो पर्यंत मागे घेतली जात नाही तो पर्यंत निर्णय होऊ शकत नसल्याचे अँड.साळवी यांनी सांगितले.अँड.कौल यांनी या प्रकरणात न्यायालयाने नवीन आरोपी केल्यामुळे त्यांचा खटला स्वतंत्रपणे चालविण्यास हरकत नाही असा युक्तीवाद केला. या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. दिलीप खोडपेंसह अन्य संशयित हजर
कापसाला शासनाने योग्य भाव द्यावा यासाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी केलेल्या आंदोलनानंतर दाखल खटल्यात न्या.मानकर यांच्या कोर्टात कामकाज झाले. या प्रकरणी पंच विनोद वानखेडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात आता २२ रोजी कामकाज आहे. कामकाजावेळी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरसेवक विजय गेही, सुरेश भोळे, सुनील माळी, दीपक सूर्यवंशी, अमित चौधरी, सागर पाटील, सुशील हासवाणी, मधुकर शिंदे, गोविंद अग्रवाल, बाबूराव घोडगे, दीपक मावरे, डॉ.नरेंद्र कोल्हे उपस्थित होते.
 

Web Title: Decision on a separate case on August 2