सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जळगावातील गाळेधारकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 13:31 IST2017-08-09T13:30:34+5:302017-08-09T13:31:22+5:30

रात्री 9 ते 11.30 वाजेर्पयत बैठक : तडजोडीचा मार्गही ठेवणार खुला

The decision of the residents of Jalgaon to go to the Supreme Court | सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जळगावातील गाळेधारकांचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जळगावातील गाळेधारकांचा निर्णय

ठळक मुद्दे महापालिकेशी तडजोडीचे दरवाजेही खुले ठेवण्याचा निर्णयगाळेधारक संघटनेतील सदस्यांची बैठक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - गाळे करार प्रश्नी उच्च न्यालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा तसेच महापालिकेशी तडजोडीचे दरवाजेही खुले ठेवण्याचा निर्णय फुले मार्केट गाळेधारक संघटनेच्या बैठकीत मंगळवारी रात्री घेण्यात आला. 
फुले मार्केट गाळेधारक संघटनेतील सदस्यांची बैठक रात्री 9 वाजता आयोजित करण्यात आली होती. रात्री 11.30 वाजेर्पयत ही बैठक सुरू होती. अध्यक्ष हिरानंद मंधवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 18 मार्केटमधील गाळे जप्त होऊ नये म्हणून गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. प्रत्येक ठिकाणच्या चर्चेत गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात जावे अशाच सूचना मिळाल्या. त्यानुसार  बैठकीत चर्चा झाली. 

Web Title: The decision of the residents of Jalgaon to go to the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.