शिरच्छेद केलेला आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:07 IST2020-01-06T22:07:26+5:302020-01-06T22:07:31+5:30

घोडसगाव शिवार : ओळख पटेना, हात व पाय वेगळे करीत निर्घृणपणे केला खून

The deceased was found dead | शिरच्छेद केलेला आढळला मृतदेह

शिरच्छेद केलेला आढळला मृतदेह

मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगांव शिवारातील नदीपात्रालगत पूर्णा नदीपात्रात कुंडजवळील पंपिग हाऊस येथे ६० ते ६५ वयोगटातील अनोळखी वृद्धाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळुन आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.
सदर वृद्धाचे तीक्ष्ण हत्याराने दोघे हात व दोघे पाय देखील धडावेगळे केले असून पायांचा शोध सुरू आहे. या क्रूर पद्धतीने केलेल्या खुनाची माहिती देणाऱ्यास पोलिसांतर्फे २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
५ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घोडसगांव शिवारातील पंपिग हाउस जवळ पदीपात्रालगत अनोळखी इसमाचे प्लॉस्टीकच्या पिशवीत मुंडके बांधुन पाण्यात फेकलेले गाठोडे मिळुन आले. सदर इसमाचे वय अंदाजे ६० ते ६५ च्या वयोगटातील असुन वर्ण गोरा, दाढी व मिशी वाढलेली तसेच केस लांब आहे. अनोळखी मयत इसमास कोणीतरी अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने शीर व हातपाय धडावेगळे करुन जीवे ठार मारले आहे.
मयताचे डोके व धळ वेगवेगळे करुन काळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या पिशवीत गाठोडे बांधुन पुर्णानदीच्या पात्रात फेकुन दिलेले होते.
शोध घेतल्यानंतर शीर व धड तर गवसले परंतु अद्याप मृतांचे दोघे हात व दोघे पाय मिळून आलेले नाही पोलीस त्याचा शोध घेत आहे
खुनाबाबत माहिती देणाºयास
२५ हजारांचे बक्षीस
याबाबत अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्या साठी तसेच खुनाबाबत माहिती देणाºयास २५ हजाराचे रोख बक्षीस व सन्मान चिन्ह जाहीर केले आहे. त्या दृष्टीने मयतांच्या वारसांना व गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसात ५/२०२० ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: The deceased was found dead