मौजमजेतून कर्जबाजारी झाला अन् काकाच्या घरात दरोड्याचा कट रचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST2021-05-10T04:15:22+5:302021-05-10T04:15:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मौज मस्ती साठी लागणारा पैसा व त्यातून कर्जबाजारी झाल्यानेच सनी इंदरकुमार साहित्या (२५, सिंधी ...

Debt-ridden out of fun | मौजमजेतून कर्जबाजारी झाला अन् काकाच्या घरात दरोड्याचा कट रचला

मौजमजेतून कर्जबाजारी झाला अन् काकाच्या घरात दरोड्याचा कट रचला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मौज मस्ती साठी लागणारा पैसा व त्यातून कर्जबाजारी झाल्यानेच सनी इंदरकुमार साहित्या (२५, सिंधी काॅलनी) याला काकाच्या घरात दरोडा टाकण्याची दुर्बुद्धी सुचली. सनीची राहणीमान, कुटुंबातील वागणूक व त्याला असलेले व्यसन यामुळे काका प्रकाश साहित्या यांना त्याच्यावर पहिल्या दिवसापासून संशय होता. हा संशय त्यांनी पोलीस अधीक्षकांजवळ व्यक्त करून दाखवला होता.

अटकेतील राकेश शिवाजी सोनवणे (३५,रा. देवपुर,धुळे) उमेश सुरेश बारी (२५, रा.चर्चच्या मागे, जळगाव) मयुर अशोक सोनवणे (३५ जळगाव) व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (३४,रा. जामनेर) या पाच जणांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. राकेश सोनवणे व बारी दोघांव्यतिरिक्त कोणाचेही यापूर्वीचे पोलीस रेकॉर्ड किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सनी याची मात्र पोलीस, गुन्हेगार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसोबत नेहमीच ऊठबस होती. इतकेच काय तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नगरसेवकाच्या थ्री स्टार हॉटेलमध्ये देखील त्याची भागीदारी होती. या हॉटेलमध्ये काही दिवसापूर्वी एका पोलिसाचीही भागीदारी होती. ही हॉटेल म्हणजे दिग्गजांचा बैठकीचा अड्डा ठरलेला होता आजही आहे. तेथेच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन एन्जॉय करायचे तर काहीजण येथूनच सूत्र हलवायचे.

पिस्तूल कनेक्शनचा शोध

या गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी पिस्तूल राकेश सोनवणे याने आणला होता. त्याने हा पिस्तूल कोणाकडून व किती रुपयात विकत घेतला किंवा त्याच्याकडे कसा उपलब्ध झाला याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. राकेश हा धुळ्यातील रहिवासी आहे. मात्र, तो सनीच्या संपर्कात कसा व कधीपासून आलेला आहे. मी काही दिवसापूर्वी अतिशय महाग कार घेतलेली होती कार कशी घेतली त्यासाठी पैसे कुठून याची देखील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

सीसीटीव्हीचे कनेक्शन कट केले सांगितले आणि तेथेच घात झाला

सनी याने दरोडा टाकण्यापूर्वी चौघांना बिल्डिंगच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन कट केले आहे असे सांगितले होते, परंतु हे कनेक्शन कट करणे तो विसरला आणि तेथेच घात झाला. घटनेच्या दिवशी सर्व संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले. हे आल्याचे लक्षात आल्यानंतर सनी याने तातडीने चौघांना अंगावरील कपडे जाळण्याचे सांगितले.

एसपींना भेटून साहित्यांनी दिली होती सनीची माहिती

या घटनेनंतर प्रकाश साहित्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेतली होती. त्यावेळी सनीच्या वागणुकीबाबत तसेच त्याच्यावर संशय असल्याचे साहित्या यांनी मुंढे यांना सांगितले होते. सर्वांगाने चौकशी करीत असताना तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी प्रभावी ठरला. सनी हा चौघांच्या सतत संपर्कात होतात त्यासाठी त्याने दुसरे मोबाइल सिमकार्ड घेतलेले होते. तंत्रज्ञान, सीसीटीव्ही फुटेज व साहित्यांचा संशय याचा मेळ जुळून आल्याने या गुन्ह्याची उकल झालेली आहे. दरम्यान, बारी याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल आहे.

Web Title: Debt-ridden out of fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.