शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पातोंडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:11 IST

नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देसततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा होता बोजा

लोकमत न्यूज नेटवर्क

पातोंडा, ता. अमळनेर : सततच्या नापिकीमुळे व डोक्यावर कर्जाचा बोजा अशा हताश झालेल्या व नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शांताराम बळीराम पवार असे आहे.

आत्महत्याग्रस्त शांताराम बळीराम पवार यांचेकडे तीन बिघे शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे शेती नापीक होऊन उत्पादन आले नाही. डोक्यावर सोसायटीचे अर्ध्या लाखाच्यावर पीक कर्ज, बाहेरील व्याजाचे व हात उसनवारीचे पैसे असे दोन लाखाच्या आसपासचे कर्ज कसे फेडायचे व संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा चिंतेत ते होते, अशी माहिती त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी दिली.

दि. १ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ते शेतात गेले. घरी जाऊन येतो, असे सांगून परत शेतातून घरी आले. आपल्या राहत्या घरी दुपारी १२ ते १ वाजेच्या च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिलीआहे. त्याचे पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावagricultureशेतीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या