पारोळ्याचे माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:00 PM2017-12-16T17:00:25+5:302017-12-16T17:09:48+5:30

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी परत केली १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफीची प्रोत्साहनपर रक्कम

Debt relief without the application of former MP Adv.Vasantrao More | पारोळ्याचे माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

पारोळ्याचे माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

googlenewsNext
ठळक मुद्देअर्ज न करताच कर्जमाफीची प्रोत्साहनपर रक्कम जमा कशी झालीखरे लाभार्थी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचितवसंतराव मोरे यांनी केली रक्कम शासनाकडे परत

आॅनलाईन लोकमत
पारोळा,जि.जळगाव, दि.१६ : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसताना त्यांना प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरे लाभार्थी वंचित आहेत व जे निकषात बसत नाही त्यांना कर्जमाफी होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी टेहू विविध कार्यकारी सोसायटीमधून कर्ज घेतले होते. पण शासनाने कर्जमाफीच्या आदेशात लोकप्रतिनिधींना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यातच माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे हे पेन्शन घेतात म्हणून ते यासाठी पात्र ठरत नव्हते. त्यानुसार त्यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरलेला नव्हता. त्यानंतरही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीची जमा झालेली रक्कम परत करीत कर्जमाफीच्या सावळ्या गोंधळाबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिने कर्जमाफीचा अभ्यास करून देखील शेतकºयांना कर्जमाफी दिली नाही. शेतकºयांना कर्जमाफी साठी अर्ज भरावा लागला आणि अर्ज भरून देखील कर्जमाफी झाली नाही. मात्र आपण अर्ज न करताच आपल्या खात्यात रक्कम कशी जमा झाली असा सवाल त्यांनी केला आहे. आपल्या गावातील मयत शेतकरी सारजाबाई आनंदा पाटील यांना कर्जमाफी मिळायला हवी होती, मात्र ती मिळाली नाही. एक रकमी परतफेड योजनेत त्यांचे प्रकरण टाकले. मात्र खºया गरजू लाभार्थींना लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Debt relief without the application of former MP Adv.Vasantrao More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.