कर्जमुक्ती करून आमदार सुरेश भोळेंनी केले आश्वासन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:51 AM2019-08-23T11:51:28+5:302019-08-23T11:52:27+5:30

आर्थिक अडचणी दूर झाल्याने विकासाला येणार गती : भुयारी गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात

 Debt-free MLA Suresh Bhole fulfilled his promise | कर्जमुक्ती करून आमदार सुरेश भोळेंनी केले आश्वासन पूर्ण

कर्जमुक्ती करून आमदार सुरेश भोळेंनी केले आश्वासन पूर्ण

Next

जळगाव : अनेक वर्षांपासून हुडको व जिल्हा बॅँकेच्या कर्जाच्या जाचात अडकलेली महापालिका कर्जातून मुक्त झाल्यामुळे आता नागरिकांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द पाळला आणि आमदार सुरेश भोळे यांनी मनपा कर्जमुक्त करण्याचे आश्वासन पूर्ण केले. शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून शहराच्या विकासाला नवी गती येणार असल्याचे सकारात्मक चित्र सध्या पहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅँकेचे कर्ज होते. हुडकोच्या १४१ कोटीच्या बदल्यात ३७४ कोटी तर जिल्हा बॅँकेच्या ५९ कोटी रुपयांच्या बदल्यात १४१ कोटी रुपये मनपाने भरले होते. अनेक वर्षांपासून हे कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडूनही प्रयत्न करण्यात आले. पाच वर्षापुर्वी आमदार सुरेश भोळे पहिल्यांदाच शहराचे आमदार झाल्यानंतर मनपा कर्जमुक्तीचा संकल्प केला होता. पाच वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून दोन आठवड्यांपुर्वीच मनपाला जिल्हा बॅँकेच्या कर्जातून मुक्त केले. त्यानंतर राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करत हुडकोचा कर्जाचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. आमदार भोळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवित हुडकोचे संपूर्ण कर्ज एकत्रितरित्या शासनातर्फे भरण्याची तयारी दर्शविली. कर्जापासून मनपाची मुक्तता झाल्यामुळे आता मालमत्ता कर स्वरुपात येणारी रक्कम असो या सर्व रक्कमेतून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
४२ कोटींच्या कामांना होईल सुरुवात
मुख्यमंत्र्यांनी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी जाहीर केलेल्या १०० कोटींपैकी मंजूर झालेल्या ४२ कोटींमधून होणाºया १३० कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांचे देखील भाग्य उजाडणार आहे. तसेच उर्वरित ५८ कोटी रुपयांमधून पाठविण्यात आलेल्या कामांना देखील मंजुरी मिळणार आहे. बुधवारी महापौर सीमा भोळे यांनी अहमदाबाद येथील कंत्राटदाराला काम सुरु करण्यासाठीचे कार्यादेश दिले.
पाच वर्षात ८९१ कोटींचा मिळाला निधी
आमदार भोळे यांनी आपल्या पाच वर्षात शहराला कधीही न मिळालेला इतका निधी शासनाकडून आणला असून, पाच वर्षात अमृत पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी तब्बल ४५० कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी ३० कोटी, समांतर रस्त्यांसाठी ६९ कोटी, पोलीस हाउंसींग सोसायटीसाठी ७० कोटी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिवाजी नगरउड्डाणपुल व पिंप्राळा रेल्वेपूलसाटी ९५ कोटी, नगरोथ्थान अंतर्गत शहरातील विकासकामांसाठी १०० कोटींसह एकूण ८९१ कोटी रुपयांचा शहरासाठी आमदार सुरेश भोळे यांनी आणला आहे.

Web Title:  Debt-free MLA Suresh Bhole fulfilled his promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.