कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:57 IST2019-06-23T18:56:53+5:302019-06-23T18:57:49+5:30

गालापुर शिवारात कडूनिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

The debt of a farmer of a debt-stricken farmer suicides | कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या




निपाणे, ता.एरंडोल : जवखेडसीम येथील शेतकरी तुकाराम शहादू हटकर या कर्जबाजारी शेतकºयाचा मुलगा योगेश तुकाराम हटकर (३२) याने २२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात गालापुर शिवारात कडूनिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. योगेश हटकर हा एकुलता एक मुलगा होता. त्याला ४ वर्षाची मुलगी व २ वर्षाचा मुलगा, पत्नी आहे. तो घरातील कर्ता मुलगा होता. कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश हटकर यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

Web Title: The debt of a farmer of a debt-stricken farmer suicides