पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 21:58 IST2019-10-01T21:57:38+5:302019-10-01T21:58:17+5:30

तांदुळवाडी रेल्वेगेटजवळील घटना : खड्ड्यात पाय घसरल्याने संपले जीवन

 The death of a young man drowned in water | पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू



भडगाव : तालुक्यातील तांदुळवाडी रेल्वेगेटजवळील २० फुट खड्ड्यात २२ वर्षीय शेतमजूर तरुणाचा पाय घसरुन पाण्यात बुङुन मृत्यु झाला. ही घटना १ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपुर्वी घङली.
तांदुळवाडी रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मयत सागर नाना कुºहाडे (वय २२) हा तरुण रेल्वे गेटजवळून जात होता. काम सुरु असलेल्या खड्ड्याजवळ हातपाय धुण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडून बुडाला. नागरीकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास शोधाशोध करुन पाण्याबाहेर काढले. पुढील उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
याबाबत पंढरीनाथ कुºहाडे (मयताचे काका) यांच्या खबरीवरुन भङगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जिजाबराव पवार करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत सागर हा शेतमजुरीचे काम करीत होता. कामाहुन घरी येत असताना ही घटना घडली. त्याच्या पश्चात वडील, आई, २ लहान भाऊ असा परीवार आहे. नुकताच पोलीस भरतीसाठी फॉर्मही भरला होता, अशी माहीती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

 

 

Web Title:  The death of a young man drowned in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.