कारची दुचाकीला धडक महिलेचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: September 16, 2015 00:18 IST2015-09-16T00:18:32+5:302015-09-16T00:18:32+5:30
नंदुरबार : भरधाव वेगात जाणा:या कारने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुकावल गावाजवळ घडली.

कारची दुचाकीला धडक महिलेचा जागीच मृत्यू
नंदुरबार : भरधाव वेगात जाणा:या कारने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुकावल गावाजवळ घडली. शहादा-शिरपूर रस्त्यावर कुकावल गावापासून तीन किलोमीटर अंतरावर पांढ:या रंगाच्या कारने पुढे चालणा:या एमएच-39-एच-4234 क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलच्या मागे बसलेली महिला बांगीबाई रतिलाल पाटील (वय 65, रा. शहादा) ही खाली पडली. तरीदेखील कारचालकाने वाहनाचा वेग कमी केला नाही. यात या महिलेचे डोके कारखाली आले व त्यातच तिचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी कैलास नथ्थू पाटील यांनी सारंगखेडा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पांढ:या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शेख तपास करीत आहेत.