दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 6, 2017 13:01 IST2017-05-06T13:01:20+5:302017-05-06T13:01:20+5:30

राबिया या दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला.

Death of a woman due to two wheelers | दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 6 - दीपनगरकडून जळगावकडे दुचाकीने जात असताना  दुचाकीवरून पडून राबिया बी़ पिंजारी (वय 40, पिंपळकोठा, ता़एरंडोल) या महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी साकरी फाटय़ावर घडली़ या घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ राबिया या दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल़े उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़  वरणगाव रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यात आल़े

Web Title: Death of a woman due to two wheelers