पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By Admin | Updated: March 14, 2017 13:56 IST2017-03-14T13:56:51+5:302017-03-14T13:56:51+5:30

हिंगोणा येथील बारेला दाम्पत्यात भांडणाचा वाद विकोपाला गेला, यात पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.

Death of wife in death of husband | पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 14 -  पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोणा येथील बारेला दाम्पत्यात भांडणाचा वाद विकोपाला गेला, यात पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.
 
दुधाबाई जवानसिंग बारेला (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. दुधाबाई यांना पती जवानसिंगने सोमवारी रात्री बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत  पंचनामा केला. व दुधाबाई यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी यावल येथे पाठवला. 
 
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Death of wife in death of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.