पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
By Admin | Updated: October 6, 2014 10:47 IST2014-10-06T10:45:48+5:302014-10-06T10:47:30+5:30
दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने लोखंडी आसारीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गिरड शिवारात सुधाकर चौधरी यांच्या शेतातील घरात ४ रोजी सायंकाळी घडली.

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
>
भडगाव : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने लोखंडी आसारीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गिरड शिवारात सुधाकर चौधरी यांच्या शेतातील घरात ४ रोजी सायंकाळी घडली.
धुदत्या देहडा भिलाला यास पत्नी कैकडी हिने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने धुदत्या याने तिला लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली. तिला तातडीने उपचारार्थ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला बादशहा रेमला भिलाला (पावरा) रा.वाक्या ता.सेंधवा (म.प्र.) ह.मु. पाचोरा यांच्या फिर्यादीवरून धुदत्या देहडा भिलाला (पावरा) रा.हिडली नवकाल्या ता.सेंधवा याच्याविरुद्ध ३0२, ३२३, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे. त्याच्या शोधार्थ पथकेही नियुक्त आहेत. चाळीसगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक दिलीप निकम यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तपास पोउनि नारायण बोरसे करीत आहेत. (वार्ताहर)