अपघातातील जखमीचा उपचार घेताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:22 IST2019-06-22T21:22:20+5:302019-06-22T21:22:27+5:30

हळहळ : मोंढाळा रस्त्यावरची दुर्घटना

 Death while treating an injured wounded | अपघातातील जखमीचा उपचार घेताना मृत्यू

अपघातातील जखमीचा उपचार घेताना मृत्यू

 

पाचोरा : येथील रवी टेंट हाऊसचे मालक व कृष्णापुरी भागातील रहिवासी सुनील रामदास पाटील (वय ४८) यांचे शनिवारी उपचारा दरम्यान निधन झाले.
पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर १९ रोजी रात्री मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून सुनील पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावलली. माजी नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांचे ते बंधू होते.
दरम्यान, सुनील पाटील यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title:  Death while treating an injured wounded