विठ्ठल वाणी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:38+5:302021-09-10T04:23:38+5:30
कळमडू ता. चाळीसगाव : कुस्तीचा आखाडा गाजविणारे नामवंत मल्ल विठ्ठल त्र्यंबक वाणी (८५) यांचे गुरुवारी धुळे येथे निधन झाले. ...

विठ्ठल वाणी यांचे निधन
कळमडू ता. चाळीसगाव : कुस्तीचा आखाडा गाजविणारे नामवंत मल्ल विठ्ठल त्र्यंबक वाणी (८५) यांचे गुरुवारी धुळे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी अनेक तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले होते.
प्रशांत मुळे
पारोळा : बहादरपूर येथील रा. का. मिश्र विद्यालयातील शिक्षक प्रशांत शरद मुळे ( ५१ रा. डी डी नगर भाग २) पारोळा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ते शिक्षिका भावना मुळे यांचे ते पती होत.
पुष्पाबाई चौधरी
अडावद ता. चोपडा : पुष्पाबाई गजानन चौधरी (७२) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सतीश चौधरी यांच्या मातोश्री होत.
श्रावण मोरे
रत्नापिंप्री ता. पारोळा : दबापिंप्री येथील श्रावण चिंधा मोरे (५०) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे.