अपघातातील ‘त्या’ जखमीचा मृत्यू

By Admin | Updated: January 8, 2017 00:54 IST2017-01-08T00:54:39+5:302017-01-08T00:54:39+5:30

एरंडोल : येथे कार उलटून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पूरनदास श्यामबाबू पचरवाल (वय 48, रा.भुसावळ) यांचे उपचारादरम्यान जळगाव येथे सामान्य रुग्णालयात निधन झाले.

Death of 'those' wounded in accident | अपघातातील ‘त्या’ जखमीचा मृत्यू

अपघातातील ‘त्या’ जखमीचा मृत्यू


एरंडोल : येथे कार उलटून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पूरनदास श्यामबाबू पचरवाल (वय 48, रा.भुसावळ) यांचे उपचारादरम्यान जळगाव येथे सामान्य रुग्णालयात निधन झाले.
एरंडोल-पिंपळकोठा दरम्यान 3 जानेवारी रोजी कार अचानक उलटल्याने कारमधील दोघांपैकी पूरनदास पचरवाल हे गंभीर जखमी झाले.
108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तत्काळ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत शनिवारी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली                      आहे.
हवालदार राजेंद्र पाटील, मधुकर पवार, श्रीराम पाटील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Death of 'those' wounded in accident