निधन वार्ता- रामकृष्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST2020-12-06T04:17:40+5:302020-12-06T04:17:40+5:30

(०६रामकृष्ण पाटील-निधन) जळगाव : रामकृष्ण झिपरू पाटील (८५,रा.बेंडाळेनगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, ...

Death talk- Ramakrishna | निधन वार्ता- रामकृष्ण

निधन वार्ता- रामकृष्ण

(०६रामकृष्ण पाटील-निधन)

जळगाव : रामकृष्ण झिपरू पाटील (८५,रा.बेंडाळेनगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली,जावई , नातवंडे असा परिवार आहे. ते गोदावरी फाउंडेशनचे मुख्य लेखापाल योगेश पाटील यांचे वडील होते.

विपिन गुजराथी

(०६विपीन गुजराथी-निधन)

जळगाव : सीए विपिन कृष्णदास गुजराथी (६६,रा.पुणे) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, कृष्णा, मुलगी, जावई, मोठे भाऊ असा परिवार आहेत. सीए कृष्णा गुजराथी यांचे ते वडील होत.

माधवराव पाटील

(०६माधवराव पाटील-निधन)

जळगाव : जिल्हा परिषदेमधील सेवानिवृत्त मुख्य लेखापाल माधवराव यादवराव पाटील (रा.शिवाजीनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिकामधील हेमंत पाटील यांचे ते वडील होत.

विठ्ठल वाडीले

(०६विठ्ठल वाडीले-निधन)

जळगाव : विठ्ठल दगडू वाडीले (रा.रेल,ता.धरणगाव) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. उत्तम वाडीले यांचे ते वडील होत.

भागीरथीबाई पाटील

(०६भागीरथीबाई पाटील-निधन)

जळगाव : भागीरथीबाई अर्जुन पाटील (रा.जुना खेडीरोड) यांचे आज दि. ५ रोजी निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून सकाळी 10 वाजता निघणार आहे. संजय अर्जुन पाटील यांच्या त्या आई होत.

Web Title: Death talk- Ramakrishna