निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:49+5:302021-09-12T04:21:49+5:30

जळगाव : प्रकाश धांडे ( ७०, रा.मेहरुण) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : प्रकाश धांडे ( ७०, रा.मेहरुण) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. खुशवंत धांडे यांचे ते वडील व ईश्वर चौधरी यांचे सासरे होत.

----------

किरण कोल्हे

जळगाव : किरण कोल्हे (२७, रा.असोदा) यांचे बुधवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. आशा कोल्हे यांचे सुपुत्र व रुख्मेश कोल्हे यांचे ते भाऊ होत.

----------

प्रकाश ठाकरे

जळगाव : रेमंड कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश ठाकरे (६३, रा.अयोध्या नगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रमोद ठाकरे यांचे ते वडील होत.

-------------

अशोक इंगळे

जळगाव : जिल्हा व सत्र न्यायालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अशोक इंगळे (६७, रा. दत्त मंदिराजवळ, संभाजी नगर) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

--------

शशिकांत नेमाडे

जळगाव : शशिकांत नेमाडे ( चिनावलकर) (रा.प्रभात कॉलनी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

-------------

सिंधुबाई साळुंखे

जळगाव : सिंधुबाई विश्वनाथ साळुंखे (रा.जिवरामनगर, खोटे नगर) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ११ वाजता निघेल. यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे.

----------

मुरलीधर भंगाळे

जळगाव : मुरलीधर भंगाळे (७८, रा.पार्वती नगर) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मनोज भंगाळे यांचे ते वडील होत.

------------

प्रमिला वाणी

जळगाव : प्रमिलाबाई वाणी (७८, रा.जयकिसनवाडी) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी १० वाजता निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीनिवास व सचिन वाणी यांच्या त्या आई होत.

--------

डॉ.राजेश फालक

जळगाव : डॉ.राजेश फालक (रा.अंबिका हौउसिंग सोसायटी) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुनील फालक यांचे बंधू होत.

---------------

काशिनाथ भोळे

जळगाव : काशिनाथ भोळे (९३ ) यांचे शनिवार रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई असा परिवार आहे. संजीव व अनिल भोळे यांचे ते वडील होत.

------------

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.